2 मिनिटात करा स्टेटस चेक करा; लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का नाहीत ( Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana DBT Status Check)
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल एक सोपी आणि महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. या योजनेनुसार महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे एकत्र जमा होतील. त्यामुळे महिलांना मकर संक्रांतीपूर्वी 3 हजार रुपये मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजना कधी सुरू झाली?
ही योजना जुलै महिन्यात सुरू करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांत 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे या योजनेला काही काळ थांबावे लागले होते.
महिलांना 3 हजार रुपये कसे मिळणार?
निवडणुकीनंतर महायुती सरकार स्थापन झाल्यावर महिलांना सहाव्या हप्त्याची वाट होती. आता सरकारने जाहीर केले आहे की डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे हप्ते एकत्र जमा केले जातील. या रकमेचा लाभ महिलांना मकर संक्रांतीपूर्वी होईल.
2 मिनिटात करा स्टेटस चेक ( Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana DBT Status Check)
ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अप्लाय केलाय त्या सर्वांना डीबीटी स्टेटस फक्त 2 मिनिटांमध्ये चेक करता येईल. तुम्ही तुमचा मोबाईल, लॅपटॉप, टॅब, कॉम्पुटर किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून तात्काळ हे स्टेट चेक करु शकता. त्यासाठी आम्ही सांगितलेली प्रोसेस क्रमवार पद्धतीनं (स्टेप बाय स्टेप) फॉलो करा.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डीबीटी स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम आधार कार्डची https://uidai.gov.in ही अधिकृत वेबसाईट सुरु कराया
- अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथं Bank Seeding Status हा ऑप्शन दिसेल.
- त्यावर क्लिक करात्यानंतर नवीन पेज ओपन होईल.
- त्यावर तुमचा आधार कार्ड नंबर एंटर कराआता कॅप्चा कोड भरा आणि Send OTP बटणावर क्लिक कराआधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तो टाकून व्हेरिफिकेशन करा
- ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर DBT Status ओपन होईल ते चेक करातुमचे डीबीटी स्टेटस अॅक्टिव्ह असेल तर निर्धास्त राहा.
- दर महिन्याला तुमच्या खात्यात या योजनेची रक्कम जमा होईल.तुमचे डीबीटी स्टेटस अॅक्टिव्ह नसेल तर लवकरात लवकर तुमच्या बँकेशी संपर्क साधून ते अॅक्टिव्ह करा
योजनेचा उद्देश आणि फायदा
लाडकी बहीण योजना आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये दिले जातात. या पैशांमुळे महिलांना थोडी आर्थिक मदत होते आणि त्यांना आत्मनिर्भर होण्यास प्रोत्साहन मिळते.
योजनेसाठी मंजूर निधी
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसाठी 1400 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच, पुढील अर्थसंकल्पात महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचा विचार सरकार करत आहे.
पुढील योजना काय?
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे हप्ते सर्वप्रथम जमा केले जातील. त्यामुळे कोट्यवधी महिलांना याचा मोठा लाभ होईल.
लाभ कसा घ्यावा?
लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास, पात्र महिलांनी आपले नाव लाभार्थी यादीत तपासून खात्री करावी.